हर घर तिरंगा अभियानांतर्गत उपक्रम
वेंगुर्ले l प्रतिनिधी :हर घर तिरंगा अभियानांतर्गत शिरोडा ग्रामपंचायत च्या वतीने शिरोडा उपजिल्हा रुग्णालय परिसराची स्वच्छता करून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या स्वच्छता मोहिमेमध्ये सरपंच, उपसरपंच यांच्यासह सदस्य तसेच रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व परिचारिका, कर्मचारी सहभागी झाले होते.
रुग्णालयाच्या परिसरात साफसफाई करताना शिरोडा ग्रामपंचायत सरपंच सौ लतिका रेडकर, उपसरपंच चंदन हाडकी, सदस्य पांडुरंग नाईक, प्रथमेश परब, मयुरेश शिरोडकर, राजन धानजी, सुधीर नार्वेकर, अर्चना नाईक, नंदिनी धानजी, सौ हेतल गावडे, सौ रश्मी डिचोलकर व जगन बांदेकर तसेच ग्रामपंचायत कर्मचारी आनंद शेट्ये, सुनिल रेडकर, उपजिल्हा रुग्णालय शिरोडा येथील डॉ आकाश काठोळे, कुशे सिस्टर, वराडकर सिस्टर, क्लार्क सतिश गुहाडे, कर्मचारी केरकर मामा, परेरा, अनावकर मावशी व अन्य सहभागी झाले होते. या मोहिमेच्या माध्यमातून सर्वांनी स्वच्छता राखा हा संदेश देण्यात आला.













