तुम्हाला न्याय कसा मिळेल या दृष्टीने मी स्वतः पाहतो नितेश राणे यांचे आश्वासन
लांजा( प्रतिनिधी ) रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आलेल्या राज्याचे मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी आज गुरुवारी दुपारी ३ वाजता डम्पिंग ग्राउंड विरोधात उपोषणाला बसलेल्या कोत्रेवाडी ग्रामस्थांची भेट घेतली आणि तुम्हाला न्याय मिळण्यासाठी मी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून न्याय मिळण्यासाठी मी पाहतो असे ठोस आश्वासन दिले .
लांजा नगरपंचायतीच्या वतीने कोत्रेवाडी येथे वाडी वस्तीलगत आणि नियम पायदळी तुडवून जोर जबरदस्तीने डम्पिंग ग्राउंड प्रकल्प राबवला जात आहे. या विरोधात कोत्रेवाडी ग्रामस्थांच्या वतीने गेल्या चार वर्षांपासून उपोषण, आंदोलने केली जात आहेत. त्याच अनुषंगाने या डम्पिंग ग्राउंड हटाव साठी आज गुरुवारी १४ ऑगस्ट पासून कोत्रेवाडी ग्रामस्थांच्या वतीने बेमुदत उपोषण छेडण्यात आलेले आहे .
जिल्हा दौऱ्यावर आलेल्या राज्याचे मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी लांजा तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसलेल्या
कोत्रेवाडी ग्रामस्थांनी भेट घेतली.यावेळी ग्रामस्थांच्या वतीने मंगेश आंबेकर यांनी सांगितले की, जिल्हा प्रशासनाने अयोग्य ठरवलेली कोत्रेवाडी येथील
जागा ही नगरपंचायतीने डंपिंग ग्राउंड साठी घेतली असून नगरपंचायत प्रशासन कोणाच्या तरी दबावाखाली काम करत आहे. आणि त्या विरोधात आम्ही ग्रामस्थ गेले चार वर्षे लढा देत आहोत. मात्र तरी देखील अधिकारी याकडे फिरकत नाहीत .त्यामुळे आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली .
यावेळी आपण स्वतः संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करतो आणि तुम्हाला न्याय कसा मिळेल हे मी स्वतः पाहतो असे ठोस आश्वासन मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी उपोषण कर्त्या कोत्रवाडी ग्रामस्थांना दिले. मंत्री नितेश राणे यांनी दिलेल्या आश्वासनाबद्दल कोत्रेवाडी ग्रामस्थांनी त्यांचे विशेष आभार मानले आहेत.












