ना. नारायण राणे, ना. रवींद्र चव्हाणांच्या उपस्थित झाला प्रवेश
राजापूर (प्रतिनिधी): भाजपाच्या वतीने सोमवारी मोदी @९ महाजनसंपर्क अभियानाचा लेखा जोखा मांडण्यासाठी राजापुरात आयोजित करण्यात आलेल्या जाहिर सभेत डॉ. चंद्रशेखर निमकर यांसह राजापूर व लांजा तालुक्यातील शेकडो कार्यकत्यार्नी भाजपामध्ये जाहिर प्रवेश केला. केद्रीय उद्योगमंत्री ना. नारायण राणे, सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रवींद्र चव्हाण, मुंबई प्रदेशाध्यक्ष अशिष शेलार, आमदार प्रविण दरेकर या मान्यवरांच्या उपस्थितीत या सर्व प्रवेशकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.
भाजपाच्या वतीने मोदी @९ महाजनसंपर्क अभियानाचा लेखा जोखा मांडण्यासाठी राजापुरात राजापूर हायस्कुलच्या पटांगणावर जाहिर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत या सर्वांग प्रवेश केला.
याप्रसंगी व्यासपीठावर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रवींद्र चव्हाण भाजपाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आ. आशिष शेलार, अभियान राज्य प्रभारी आ. प्रवीण दरेकर, आ. नितेश राणे, माजी आमदार अजित गोगटे, प्रदेश उपाध्यक्ष अतुल कालेसेकर, भाजपा जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष माजी आमदार प्रमोद जठार, माजी आमदार बाळ माने, राजापूर विधानसभा प्रभारी उल्का विश्वासराव, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी, महिला आघाडीच्या ऐश्वर्या जठार, संध्या तेरसे, प्रदेश महिला सरचिटणीस सौ. शील्पा मराठे,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र नागरेकर, तालुका अध्यक्ष अभिजीत गुरव जिल्हाध्यक्ष अनिलकुमार करंगुटकर, तालुका महिला आघाडी अध्यक्षा सौ. शृती ताम्हनकर, आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी डॉ. निमकर यांसह राजापूर तसेच लांजा तालुक्यातील अनेक कार्यकर्ते, महिलांनी भाजपाचा झेडा हाती घेतला. या सर्वांचे उपस्थित मान्यवरांचे पक्षात स्वागत केले.
फोटो 27 आरजेपी 4
भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्या डॉ. चंद्रशेखर निमकर यांचेसह अन्य प्रवेशकत्यांसोबत केंद्रीय उद्योगमंत्री ना. नारायण राणे याप्रसंगी ना. रवींद्र चव्हाण, आशिष शेलार, प्रविण दरेकर आदींसह मान्यवर.