जाकादेवी- रत्नागिरी जिल्ह्यातील पन्हळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
पावसाची पर्वा न करता, विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी झाले होते. मुसळधार पाऊस सुरू असतानाही, सर्वांनी छत्र्यांच्या आधारे राष्ट्रध्वजाला सलामी दिली. ‘वन्दे मातरम्’ आणि ‘भारत माता की जय’ च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषणे दिली आणि कवायती सादर केल्या. प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणातून उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी विविध स्पर्धांमधील विजेत्यांना बक्षिसे देऊन गौरवण्यात आले. तसेच, विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या हस्तकला वस्तूंचे प्रदर्शनही भरवण्यात आले होते, ज्याला उपस्थितांनी चांगली दाद दिली.
अध्यक्षांच्या मनोगतानंतर कार्यक्रमाचा समारोप झाला आणि विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. पावसाच्या सरींमध्येही साजरा झालेला हा स्वातंत्र्य दिनाचा सोहळा उपस्थितांसाठी अविस्मरणीय ठरला.













