मुख्याधिकारी महादेव रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनबद्ध उपाययोजना
मंडणगड (प्रतिनिधी): मंडणगड शहरात संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पाण्याची उपलब्धता वाढविण्याच्या दृष्टीने मंडणगड नगरपंचायतीच्या वतीने २८ऑक्टोंबर २०२६ रोजी निवळी नदीवर गांधी चौक येथील उद्भवाच्या शेजारी बंधारे बांधण्यात आले . नगरपंचायतीचे मुख्याधिकारी महादेव रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनबद्ध पद्धतीने ही उपाययोजना करण्यात आली.
उन्हाळ्यात उद्भवणारी पाणीटंचाई लक्षात घेऊन पाण्याचा साठा टिकवून ठेवणे आणि उपलब्ध जलस्रोतांचा योग्य वापर करणे आवश्यक असते. या दृष्टीने नगरपंचायतीने निवळी नदीवरील गांधी चौक उद्भव परिसरात बंधारे बांधण्याचे नियोजन केले. या उपाययोजनेमुळे परिसरातील पाण्याची उपलब्धता वाढविण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे. बंधारे बांधण्याच्या उपक्रमास नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष वैभव कोकाटे, गटनेते विनोद जाधव, नगरसेवक मुकेश तलार, सुधीर हातमकर, आदेश मर्चंडे नगरपंचायतीचे कर्मचारी मनोज मर्चंडे गणेश सापटे सर्व कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
पाणी टंचाईवर मात करण्यासाठी स्थानिक जलस्रोतांचे संवर्धन, पाण्याचा योग्य वापर आणि वेळेत नियोजनबद्ध उपाययोजना करणे महत्त्वाचे ठरते. मंडणगड नगरपंचायतीने केलेल्या या कामामुळे आगामी काळातील पाणीपुरवठ्याच्या नियोजनाला मदत होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.













