मसुरे | झुंजार पेडणेकर : मालवण तालुक्यातील ग्रामपंचायत मालोंडच्या वतीने बेलाचीवाडी येथे शासनाच्या धोरणानुसार जल अर्पण दिन सोहळा मालवण पंचायत समिती सभापती सौ प्रज्ञा चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग स्वच्छता विभागाच्या परब मॅडम, सरपंच सौ पुर्वा फणसगावकर, उपसरपंच लक्ष्मण चव्हाण, सदस्य संतोष आचरेकर, अनुष्का परब,भारती घाडीगांवकर, भक्ती तांडेल, वैष्णवी परब,मालोंड शाळा शिक्षक खोब्रागडे मॅडम, बेलाची वाडी शाळा शिक्षक उमेश देशमुख, सुत्र संचालक तथा वेरळ शाळा शिक्षक श्री धारपवार, ग्रामपंचायत अधिकारी देवरुखकर मॅडम, तलाठी श्री जाधव, अंगणवाडी सेविका बेलाची वाडी श्रीमती लब्दे,मालोंड सेविका स्नेहल पारकर,मालोंड पो.पाटील हर्षद घाडीगांवकर, बेलाची वाडी पो.पाटील अक्षता मालोंडकर, सुभाष परब, सुरेश घाडीगांवकर, माजी उपसरपंच जितेंद्र परब, जेष्ठ नागरिक गोविंद परब व मालोंड बेलाचीवाडी येथील महिला पुरुष ग्रामस्थ, ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी सर्व प्रथम मान्यवरांचे स्वागत ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले. त्या नंतर सभापती सौ प्रज्ञा चव्हाण यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून व प्रतिमेचे पूजन करण्यात आले.तर उपस्थित मान्यवर आणि जलसुरक्षक योगदान करत्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्या नंतर महिलांनी आणलेल्या जल कलशांचे पुजन केले,तर जल बंधन सभापती सौ प्रज्ञा चव्हाण यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले,महिलांनी सवाद्य कलश मिरवणूक काढुन पाणी अडवा पाणी जिरवा, पाण्याचा गैरवापर टाळा अशा घोषणा देण्यात आल्या. पाणी तपासणी करण्यात आली. पाण्याचे महत्त्व आणि गरज पटवून देणारे पथनाट्य सादर केले .
सभापती प्रज्ञा चव्हाण व इतर मान्यवरांनी पाण्याचा वापर काटकसरीने करून पाणी हे जीवन आहे याचे महत्त्व पटवून देणारे विशेष मार्गदर्शन केले.या मध्ये शासनाच्या ध्येय धोरणांचा जनतेने नियमित अवलंब करून शासनाचा उद्देश सफल करावा असे आवाहन सभापती सौ प्रज्ञा चव्हाण यांनी केले. मान्यवरांच्या मार्गदर्शनानंतर सर्वांनी जलशपथ घेतली शेवटी ग्रामपंचायत अधिकारी सौ.देवरुखकर यांनी सर्वांचे आभार मानले.













