गोविंदा रे गोपाळा” च्या जयघोषात युवाई चा जल्लोष
वेंगुर्ले : दाजी नाईक
वेंगुर्ले शहरातील मानाची दहीहंडी गाडीअड्डा येथे एकावर एक असे चार थर रचत गोविंदांनी जल्लोषी वातावरणात फोडली. तीन-चार प्रयत्नानंतर दहीहंडी फुटतात “गोविंदा रे गोपाळा” च्या जयघोषात युवाई ने जल्लोष केला. नागरिकांनीही येथे उपस्थित राहत गोविंदांना साथ दिली. वेंगुर्ले शहरासह तालुक्यात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
गाडीअड्डा मित्र मंडळाच्या वतीने वेंगुर्ले येथील गाडीअड्डा येथे मानाची दहीहंडी उत्सव सायंकाळी पासून सुरू झाला होता. लहान मोठे गोविंदा येथे गोविंदाचा जयघोष करत होते पाण्याचे फवारे मारून एकमेकांना भिजवत होते. मध्ये पावसानेही हजेरी लावल्याने वातावरण रंगतदार ठरले. अखेर सर्वांनी एकसंघ पणे दहीहंडी फोडण्यासाठी प्रयत्न
सुरू केले.
दोन तीन प्रयत्न फासले. मात्र अखेर चार थर सजवत ही दहीहंडी फोडली. या प्रमाणेच वेंगुर्ले सातेरी व्यायाम शाळेतर्फे ही दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. व्यायाम शाळेसमोर दहीहंडी बांधून व्यायामपटूंनी ही दहीहंडी फोडली. त्या ठिकाणी रस्सीखेच हा खेळ सुद्धा खेळत गोविंदानी या उत्सवाला रंगत आणली. दरम्यान तालुका स्कूल मधील श्री कृष्णाची मूर्ती वाजत गाजत साकव पुल येये नेऊन विसर्जन करण्यात आले. तर ज्यांच्या ज्यांच्या घरी श्रीकृष्ण मूर्ती पूजन केले होते तेथे आज विसर्जन करण्यात आले. शेवटी दहिकाल्याचा प्रसाद वाटप करून या उत्सवाची सांगता झाली.













