चिपळूण (प्रतिनिधी) : रिगल पब्लिक सीबीएसई स्कूल, कोंढे येथे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे नाविन्यपूर्ण उपक्रम सातत्याने राबवले जात असतात. यावर्षीच्या “तिरंगा महोत्सवाच्या” निमित्ताने रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. “तिरंगा” या विषयाला अनुसरून रांगोळी काढायची होती. या रांगोळी स्पर्धेमध्ये विद्यार्थी उत्स्फुर्तपणे सहभागी झाले होते.
गट अ – इयत्ता पहिली ते चौथी असा होता. या गटाला ‘भारताचा राष्ट्रध्वज रेखाटणे’ हा विषय दिलेला होता. यामध्ये कु. माही लाहीम, स्वरा सावर्डेकर, काव्यांशी पाटील या गटाला प्रथम तसेच रेवती लादे, हर्षली चिले या गटाला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. गट ब- इयत्ता पाचवी ते सातवी असा होता. या गटाला ‘भारताचा नकाशा’ हा विषय दिलेला होता. यामध्ये द्विती पाटील, अन्वी पवार, राजवी साळवी या गटाला प्रथम तसेच रुद्र जावळे, अहमद रजा, प्रसन्न सावंत या गटाला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले गट क इयत्ता आठवी ते दहावी असा होता. या गटाला सर्वधर्मसमभाव दर्शन’ हा विषय दिलेला होता. यामध्ये पूर्वी रेवाळेला प्रथम क्रमांक तसेच ऋतुजा लादे, सबिन म्हतारनाईक, अस्मी पवार या गटाला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे, हेच रिगल पब्लिक सीबीएसई स्कूलचे ध्येय आहे. रिगल पब्लिक सीबीएसई स्कूलमध्ये अशा अनेक स्पर्धा घेतल्या जातात. या स्पर्धेसाठी रिगल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय शिर्के, संचालिका डॉ.सौ. सुमिता शिर्के, संचालक मंडळ यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. प्रशालेतील शिक्षकांच्या महत्वपूर्ण प्रयत्नांनी तसेच विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे ही रांगोळी स्पर्धा अतिशय उत्साहात पार पडली.












