वैभववाडीत भाजपा पुरस्कृत दहीहंडी : बिगबाॅस विजेते शिव ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती
राजापूर तालुक्यातील कालिका देवी गोविंदा पथक भू यांनी फोडली दहीहंडी
वैभववाडी l प्रतिनिधी : एकजुटीने हिंदू धर्मातील विविध सण व उत्सव जल्लोषात साजरे करूया. दहीहंडीतील उंच थराप्रमाणे जिल्ह्याचा विकासही त्याच पद्धतीने करणार व सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात एक नंबरला घेऊन जाणार. असे प्रतिपादन मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री, तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केले. वैभववाडी येथे भाजपा पुरस्कृत दहीहंडी कालिका देवी गोविंदा पथक भू ता. राजापूर या पथकाने फोडली.
वैभववाडी भाजपाच्या वतीने आयोजित दहीहंडी उत्सव 2025 येथील इनामदार प्लाझा मैदानावर संपन्न झाला. बिगबाॅस विजेते शिव ठाकरे यांची उपस्थिती कार्यक्रमाचे आकर्षण ठरले. या दहीहंडी उत्सवाला नितेश राणे यांनी हजेरी लावली. नितेश राणे म्हणाले, दरवर्षीप्रमाणे वैभववाडीला साजेशी दहीहंडी या ठिकाणी संपन्न होत आहे. हा उत्सव उत्साहात वाढतोय. वैभववाडीचा आमदार या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. त्यामुळे इथे आता काही कमी पडणार नाही. मुंबईत थरावर थर लावून या उत्सवाचा दर्जा वाढत आहे. त्याच पद्धतीने मनोज रावराणे मित्र मंडळाच्या गांगो माऊली गोविंदा पथक फोंडाघाट यांनी सात थर लावून सलामी दिली. त्यांचे यावेळी त्यांनी अभिनंदन केले. उपस्थित सर्व पथकांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. या उत्सवात एकूण आठ गोविंदा पथक सहभागी झाले होते. स्थानिक गोविंदा पथकासह असलेदे, सडुरे, खारेपाटण , एडगांव, राजापूर या भागातील गोविंद पथक सहभागी झाले होते.
सात थर लावणाऱ्या गांगो माउली गोविंदा पथकाला नितेश राणे यांच्या हस्ते रोख बक्षीस व सन्मानचिन्ह देण्यात आले. तसेच दहीहंडी फोडणाऱ्या राजापूर भू गोविंद पथकाला गौरविण्यात आले. यावेळी वैभववाडी भाजपा मंडल अध्यक्ष सुधीर नकाशे, जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे, दिलीप तळेकर, मनोज रावराणे, प्रमोद रावराणे, जयेंद्र रावराणे, नासीर काझी, भालचंद्र साठे, सज्जन काका रावराणे, दिगंबर पाटील, अरविंद रावराणे, विजय तावडे, श्रद्धा रावराणे, प्राची तावडे, बंड्या मांजरेकर, प्रदीप रावराणे, नवलराज काळे, अतुल सरवटे, रितेश सुतार, संजय सावंत, राजेंद्र राणे, हुसेन लांजेकर, देवानंद पालांडे पदाधिकारी, कार्यकर्ते व रसिक प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोल्हापूर येथील नटरंग ऑर्केस्ट्रा च्या कलाकारांनी या उत्सवाला रंगत आणली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संतोष हरयाण यांनी मानले.












