खेड | प्रतिनिधी :
खेड तालुक्यातील अंजनी भोईवाडी येथे मुसळधार पावसामुळे अंगणवाडी शाळेची भिंत व बंदरा कोसळल्याची घटना घडली आहे. ही दुर्घटना रात्रीच्या सुमारास झाल्याने मोठा अनर्थ टळला असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच वाडीतील ग्रामस्थांनी तातडीने तलाठी आणि सरपंच यांना कळविले. त्यानंतर उपसरपंच संतोष कान्हेरे यांनी सर्व संबंधित अधिकारी यांना घेऊन घटनास्थळी प्रत्यक्ष पाहणी केली व पंचनामा केला. मुसळधार पावसामुळे तालुक्यात अनेक ठिकाणी धोकादायक परिस्थिती निर्माण झाली असताना ही घटना घडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.













