- *खेड*
1.जगबुडी नदीची पाणी पातळी 7.80 वरून कमी होऊन 7.40 वर आहे. 2.Catchment area मध्ये पाऊस मागील दोन तासांपासून कमी झाला आहे. 3.सद्यस्थिती मध्ये पाणी शहरात आलेले नाही. 4.खेड दापोली रस्त्यावर पाणी साचले असल्याने वाहतूक बंद ठेवली आहे. शहरातील अन्य मार्गानेअवजड वाहने वगळून वाहतूक सुरू आहे . 5. सर्व यंत्रणा सज्ज असून परिस्थिती नियंत्रणात आहे
*मंडणगड*
1.मंडणगड तालुक्यात पावसाचा जोर सध्या कमी आहे. दिवसभरात 60 70 mm पाऊस पडला आहे. 2. 1 2 ठिकाणी घरांची पडझड/किरकोळ नुकसान आहे. जीवितहानी नाही. 3. रस्ते वाहतूक सुरळीत सुरू आहे. 4. सर्व परिस्थिती नियंत्रणात आहे.
*रत्नागिरी*
तालुक्यात पावसाचा जोर कमी होत चाललेला आहे नद्यांची पातळी सुद्धा नियंत्रणात आहे. सर्व ठिकाणी वाहतूक व्यवस्था सुरळीतपणे चालू आहे. सर्व परिस्थिती नियंत्रणात आहे.
*राजापूर*
1) राजापूर शहरातील पाणी ओसरले आहे. जवाहर चौकातील वाहतूक पूर्ववत झाली आहे. पाणी पातळी 7.4 मी वरून 6.6 मी वर आली आहे. 2) पाऊस कमी झालेला आहे. पाऊस कमी ते मध्यम स्वरूपाचा अधूनमधुन पडत आहे. 3) सर्व यंत्रणा सज्ज असून परिस्थिती नियंत्रणात आहे.4) दिवसभरात 4 घरे व एका गोठ्याचे नुकसान झाले आहे.
*संगमेश्वर*
1. सोनगिरी येथे पाण्याची पातळी वाढायला लागल्याने लियाकत कापडे ( आंगवली) आणि कासम मयेर ( त्यांच्या घरी दुसऱ्या मजल्या वर)यांच्या घरात पाणी घुसण्याची शक्यता आहे. त्यांना सुरक्षित ठिकाणी पाठवलं आहे. 2. वांद्री येथील बावनदी जवळ तळे काँटे येथील कोणती ही लोक तिथे राहत नाहीत. दुकानात पाणी शिरू शकते म्हणून त्यांनी सामान दुसरीकडे हलवले आहे. 3. रात्र भर पाऊस पडला तर पऱ्याच पाणी घरात घुसू शकते म्हणून आंबेड बुद्रुक इब्राहिम केळकर यांना सुरक्षित ठिकाणी पाठवलं आहे 4. रामपेठ, संगमेश्वर नदीची पातळी वाढली आहे आठवडा बाजार परिसरात पाणी आले आहे नुकसान नाही. 5. माखजन बाजारपेठेत पुराच्या पाण्यात सातत्याने वाढ होत आहे. बाजारपेठ अध्यक्ष यांना दुकानातील सामान सुरक्षित स्थळी ठेवण्यास सांगितले आहे. 6. आंबा घाटामध्ये आज दोनदा दरड पडली होती परंतु महसूल यंत्रणेच्या उपस्थितीत ती अर्ध्या तासात दूर करण्यात आली. 7. रस्ते वाहतूक सुरळीत सुरू आहे. 8. सर्व यंत्रणा अलर्ट मोडवर असून परिस्थिती नियंत्रणात आहे.
*गुहागर*
1. मागील १ तासापासून गुहागर तालुक्यात पाऊस कमी झाला आहे. 2. सद्यस्थितीत गुहागर तालुक्यातील कोणत्याही रहिवासी भागात पाणी आलेले नाही. 3. तालुक्यातील कोणत्याही रस्त्यावर अथवा पुलावर पाणी असलेले नसून वाहतुक सुरू आहे. 4. रेड अलर्ट असल्याने खबरदारी म्हणून दरडप्रवण पाचेरी सडा या गावातील ८ नागरिकांना नातेवाईकांकडे स्थलांतरित केले आहे. 5. वेळणेश्वर येथील जि.प. साकव धोकादायक असल्याने बंद केला आहे. नागरिकांना पर्यायी मार्ग आहे. 6. आज दिवसभरात 3 घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. 7. सर्व यंत्रणा सतर्क आहे.
*दापोली*
1)दापोली तालुक्यामध्ये पावसाचे प्रमाण कमी झाले संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 54 mm एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. 2)जालगाव, मुरुड, केळशी या भागात साठलेले पाण्याचा निचरा झाला आहे. 3) करंजाळी येथे गुरांच्या गोठ्याचे नुकसान झाले आहे मात्र सर्व गुरे सुरक्षित आहेत. 4) लोणवडी गावातील 3 घरांचे वारा, पावसामुळे नुकसान झाले आहे. 5) सुरक्षिततेच्या दृष्टीने हर्णे येथील 2 कुटूंबातील 9 व्यक्ती आसुद येथील 2कुटुंबातील 6व्यक्ती दाभोळ येथील 2कुटूंबातील 13 व्यक्ती असे एकूण 28 व्यक्तीचे तात्पुरते त्यांच्या नातेवाईकांकडे स्थलांतर करण्यात आले आहे 6)सध्या पाऊस कमी झाल्याने वाहतूक सुरळीत असून परिस्थिती नियंत्रणात आहे. 7) सर्व यंत्रणा सतर्क आहेत.












