वन विभागाचा यशस्वी रेस्क्यू
चिपळूण : पाचाड येथील सहदेव चिले यांच्या गुरांच्या गोठ्यात माळ्यावर ठेवलेल्या पेंढ्यामध्ये तब्बल ८ ते ९ फूट लांबीचा अजगर जातीचा साप आढळून आला. ही धक्कादायक घटना बुधवारी (२० ऑगस्ट) घडली. ग्रामस्थांनी तातडीने वन विभागाला कळविल्यानंतर विभागाच्या पथकाने घटनास्थळी दाखल होत अजगराला सुरक्षितपणे पकडून अखेर नैसर्गिक अधिवासात सोडले.

या मोहिमेसाठी वन परिक्षेत्र अधिकारी, चिपळूण एस. एस. खान, वनरक्षक रामपूरचे राहुल गुंठे, वाहनचालक श्री. नंदकुमार कदम आणि सर्पमित्र श्री. प्रथमेश पवार हे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पेंढ्यामध्ये लपलेल्या अजगराला सुरक्षितरित्या पकडून बाहेर काढण्यात आले. तपासणीनंतर तो सुस्थितीत असल्याची खात्री करून त्यास जंगलात नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.
या संपूर्ण बचावकार्याचे मार्गदर्शन विभागीय वन अधिकारी, रत्नागिरी (चिपळूण) सौ. गिरिजा देसाई तसेच सहाय्यक वन संरक्षक, रत्नागिरी (चिपळूण) यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिक्षेत्र अधिकारी चिपळूण एस. एस. खान, वनरक्षक रामपूर श्री. राहुल गुंठे, सर्पमित्र श्री. प्रथमेश पवार व वाहनचालक श्री. नंदकुमार कदम यांनी ही कारवाई पार पाडली. गुरांच्या गोठ्यात मोठा अजगर आढळल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. मात्र वन विभाग आणि सर्पमित्रांनी तातडीने कारवाई करत अजगराला सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडल्यामुळे ग्रामस्थांनी दिलासा व्यक्त केला आहे.













