खेड | लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने एक विशेष शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आला. खेडमधील नामांकित ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल, बोरज येथे दिनांक २२ ऑगस्ट २०२५ रोजी लायन MJF डॉ. शेखर कोवळे यांचे “ऍक्टिव्ह लिसनिंग” या विषयावर विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन व्याख्यान आयोजित करण्यात आले.
सुमारे २०० विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात कोवळे सरांनी विद्यार्थ्यांना लक्षपूर्वक ऐकण्याचे महत्त्व, त्याचे आयुष्यातील उपयोग व भविष्यातील यशस्वी वाटचालीत होणारे योगदान याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी प्रश्नोत्तराचा तास घेतला आणि मुलांना प्रेरणादायी विचार दिले.
या वेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष महेंद्र शिरगावकर, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी सुरेश चिकणे, माजी अध्यक्ष रोहन विचारे, प्रशाळेचे सेक्रेटरी माधव पेठे, सदस्य रूपल पाटणे, मुख्याध्यापक भरत मोरे तसेच शिक्षकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल सर्व उपस्थितांनी आनंद व्यक्त केला.











