डॉ.अमेय सुरेश गोडबोले यांना मध्यप्रदेश सरकारचा मानाचा भारत श्री पुरस्कार

चिपळूण | प्रतिनिधी  : भारत श्री पुरस्कार हा दरवर्षी मध्यप्रदेश सरकार आयोजित करतो. यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून उत्तम काम करण्या व्यक्तिंची निवड केली जात. तसेच या व्यक्तींच्या कागदपत्रे तपासली जातात. त्यानंतर या सर्व व्यक्तींची मुलाखत घेतली जाते व त्यामधून उत्तम व्यक्ती पुरस्कारासाठी निवडल्या जातात. यावर्ष पहिल्या फेरीला ३०० पेक्षा जास्त लोकांची निवड करण्यात आली होती. अंतिम फेरी मध्ये फक्त ४१ लोकांना निवडण्यात आले.

पुरस्कार प्रदान कार्यसाठी आलेले पाहुणे Lt. General B.S.Sisidoya, राष्ट्रपतींच्या हस्ते विशेष सन्मान मिळालेला Air Marshal Choudhary व PARAOLYMPICS मध्ये ज्यांनी English channel(36 kms) व North Channel ज्यांनी पोहून पार केला असेल 2023 चे Padmashree पुरस्कार विजेते Shree. Satyendra Singh Lohiya हे देखील होते. कोकणच्या भूमीमध्ये ज्ञानदानाच काम कमीत कमी मोबदल्यात व काहीवेळा विनामूल्य केल्याबद्दल डॉ. गोडबोले यांना हा पुरस्कार व धनराशी प्रदान करण्यात आली. दुसऱ्या राज्याने शिक्षण क्षेत्रातील व्यक्तीचा सन्मान होण्याचा मान हा गोडबोले याना मिळाला.