दापोली :- वन्यजीव रक्षकांनी १५ ऑगस्ट पासून काम बंद आंदोलन पुकारले होते. वनविभागाचे आर एफ ओ पाटील यांनी वन्यजीव रक्षक यांच्या समवेत नुकतेच एका सभेचे आयोजन केले होते. या सभेसाठी वनरक्षक (वनपाल वगळून) उपस्थित होते. वन्यजीव रक्षकांच्या समस्या जाणून घेतल्यावर वन्यजीव रक्षकांना लागणारे सर्व साहित्य एक महिन्यामध्ये उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
सर्व सविस्तर चर्चे अंती वन्यजीव रक्षकांच्या अटी शर्ती मान्य करण्यात आल्या . मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे वन्यजीव बचावाचे काम सुरळीत सुरू करण्यात येईल असे वन्यजीव रक्षकांनी वनअधिकारी पाटील यांना सांगितले आहे. या निर्णयामुळे वन्यजीव रक्षकांसाठी पर्यावरण प्रेमींनी समाधान व्यक्त केले आहे.












