जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांची संगमेश्वर केंद्राला भेट
रत्नागिरी :
गणेशोत्सवासाठी कोकणात मोठ्या संख्येने येणाऱ्या कोकणवासीयांच्या सोयीसाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने मुंबई–गोवा महामार्गावरील विविध ठिकाणी मदत केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. या केंद्रांवर महसूल, पोलीस व आरोग्य विभागाचे कर्मचारी २४ तास कार्यरत राहून प्रवाशांना आवश्यक ती मदत करणार आहेत.

संगमेश्वर येथील मदत केंद्राला नुकतीच जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी भेट देऊन कार्यपद्धतीचा आढावा घेतला. तसेच कर्मचाऱ्यांना प्रवाशांना तातडीने मदत उपलब्ध करून देण्याच्या योग्य सूचना दिल्या.












