मंडणगड न्यायालयाच्या नूतन इमारतीची पालकमंत्री उदय सामंत यांची पाहणी

१० सप्टेंबरपर्यंत हस्तांतरणाचे निर्देश; लोकार्पण न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते

मंडणगड : प्रतिनिधी 
मंडणगड येथे नव्याने उभी राहिलेल्या दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर तसेच न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालयाच्या देखण्या इमारतीची पाहणी राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांशी आढावा बैठक घेत १० सप्टेंबरपर्यंत ही इमारत पूर्णपणे हस्तांतरित करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.

या नूतन न्यायालयीन इमारतीचे लोकार्पण तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण हे दोन ऐतिहासिक कार्यक्रम न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते होणार असल्याचे उदय सामंत यांनी जाहीर केले. या बैठकीकरिता जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, प्रशासकीय अधिकारी, पत्रकार बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.