कुंभार्ली तंटामुक्ती समिती अध्यक्ष पदावर अजित लाड यांची सर्वानुमते निवड

चिपळूण : 

मंगळवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वाजता कुंभार्ली ग्रामपंचायत मध्ये 15 ऑगस्टची तहकूब ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. कुंभार्ली गावामध्ये सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आहेत परंतु कोणत्याही प्रकारचा वाद विवाद न होता गावच्या विकास कामात, सांस्कृतिक कार्यक्रमात अग्रेसर असणारे गाव म्हणजे कुंभार्ली गावाची ओळख आहे. दरवर्षी तंटामुक्त अध्यक्ष बदलला जातो म्हणून दोन वर्षांपूर्वी ग्रामसभेत एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. कुंभार्ली गावात धनगरवाडी, काटेवाडी, बौद्धवाडी, हनुमान वाडी, गुरववाडी, लाडवाडी, गणेशवाडी, लांबेवाडी, सांगलेवाडी, काजवेवाडी, घागवाडी, विठ्ठलवाडी, सावर्डेकर वाडी, मोहल्ला अशा एकूण चौदा वाड्या असून सर्व समाजाचे लोक राहतात त्यामुळे दरवर्षी प्रत्येक वाडीतील तंटामुक्त समिती अध्यक्ष करण्याचा ठराव करण्यात आला हा एक ऐतिहासिक निर्णय कुंभार्लीतील ग्रामस्थांनी घेतला त्यामुळे यावेळी लाडवाडीचा नंबर आला. लाडवाडीने सुध्दा एक दिलाने अजित लाड यांचे नाव ग्रामसभेत सुचविले आणि ग्रामसभेने सुध्दा एक मताने अजित लाड यांच्या नावाला अनुमोदन दिले अशा प्रकारे कुंभार्ली तंटामुक्ती समिती अध्यक्ष पदावर अजित लाड यांची नियुक्ती करण्यात आली.

यावेळी सरपंच रविंद्र सकपाळ, उपसरपंच संदिप कोलगे, ग्रामसेवक विलास कदम, ग्रामपंचायत सदस्य दिपक जाधव, वसंत ताम्हणकर, राजाभाऊ नारकर, दिनेश लब्धे, अजिंक्य कोलगे, माजी तंटामुक्त अध्यक्ष शरद मोहिते, नंदू शिंदे, सुभाष कुंभार, विलास मोहिते, गणेश जाधव, केशव लांबे, अंगणवाडी सेविका भक्ती कोलगे, प्रसाद कोलगे, सुधिर जाधव,राहूल पाष्ठे , मारूती लांबे, मधूकर शिंदे, सुभाष म्हादे, श्रीमती मोहिते ताई , शैलेश जाधव, साहिल ताम्हणकर उपस्थित होते