कलंदरचे कलाकार राकेश महाडिक यांचे निधन

विजयदुर्ग ( प्रतिनिधी ) : विजयदुर्ग येथील गोपाळकृष्णवाडी या भागातील कलंदरचे कलावंत राकेश महाडिक यांचे नुकतेच अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. ते ५२ वर्षाचे होते. उत्कृष्ट बॅन्जो वादक, नकलाकार तसेच अभिनेते म्हणून ते प्रसिद्ध होते. येथील कलंदर ग्रुपच्या एकांकिका तसेच यूट्यूब चॅनेलवर त्यांनी अनेक भूमिका केल्या. हौशी रंगभूमीवर कलंदरच्या ‘ वस्त्रहरण ‘ नाटकात त्यांनी अर्जुनची भूमिका साकारली होती आणि अजरामर केली होती. राकेश महाडिक यांच्या निधनाने कलंदरचा एक बिलंदर कलावंत हरपला अशी भावना विजयदुर्गवासीयांमधून व्यक्त होत आहे.