आमदार निलेश राणे यांनी केली होती मागणी
समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांनी मंजूर केली मागणी
कुडाळ प्रतिनिधी
सिंधुदुर्गनगरी व कुडाळ येथे मागासवर्गीय मुली व मुलांसाठी वस्तीगृह मंजूर झाले आहे हे वस्तीगृह व्हावे म्हणून आमदार निलेश राणे यांनी मागणी केली होती त्यानुसार समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांनी ही मागणी मान्य केली.
ग्रामीण भागातून शिक्षणासाठी येणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी मोठी गैरसोय होत होती त्यामुळे सिंधुदुर्ग नगरी येथे असलेले मागासवर्गीय मुला मुलींचे वस्तीगृह विस्तारीकरण आणि कुडाळ येथे मागासवर्गीय मुला-मुलींसाठी नव्याने वस्तीगृह करण्यात यावे अशी मागणी आमदार निलेश राणे यांनी समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांच्याकडे केली होती ही मागणी समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांनी मान्य करून सिंधुदुर्ग नगरी येथील वस्तीगृह विस्तारीकरण आणि कुडाळ येथे नव्याने वस्तीगृह मंजूर केले आहे.











