मंडणगड : दि. 30 – शाहू फाऊंडेशन, मंडणगड या संस्थेच्या वतीने किल्ले मंडणगड व शहरातील बस स्थानक परिसरात 29 ऑगस्ट 2025 रोजी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत विविध प्रकारच्या 300 हून अधिक रोपांची लागवड करण्यात आली.
कार्यक्रमास यावेळी तहसीलदार अक्षय ढाकणे, गटविकास अधिकारी सुनील खरात, तालुका कृषी अधिकारी सोमनाथ आहेरकर, मंडळ अधिकारी निलेश गोडघासे, नगरसेवक आदेश मर्चंडे, बसपा जिल्हाध्यक्ष प्रवीण मर्चंडे, वनअधिकारी श्री. झाडे, मोहन मर्चंडे, सुरेश मर्चंडे, मंडळ कृषी अधिकारी श्री. अभंग, शाहू फाऊंडेशनचे अध्यक्ष राकेश मर्चंडे, सचिव चंद्रसेन मोहिते आदि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात यावेळी तहसीलदार अक्षय ढाकणे यांनी मनोगत व्यक्त करताना वृक्षारोपण कार्यक्रमाच्या आयोजकांचे कौतुक केले. यावेळी त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना शेतीशी सबंधित असलेला महत्वपूर्ण ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी काढण्याचे आवाहन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष राकेश मर्चंडे यांच्या मार्गदर्शनाखाली निलेश मर्चंडे, सुनील भालेराव, अमोल तळेकर, वैभव सीतापुरे, विजय मर्चंडे, स्वप्नील यादव, यश मर्चंडे, सार्थक मर्चंडे, सक्षम मर्चंडे यांनी मेहनत घेतली.
फोटो – शाहू फाऊंडेशन, मंडणगड या संस्थेच्या वतीने किल्ले मंडणगड येथे आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात उपस्थित तहसीलदार अक्षय ढाकणे, गटविकास अधिकारी सुनील खरात व अन्य मान्यवर.












