आमदार निलेश राणे यांचे संजू परब यांच्या घरी गणेश दर्शन

बांदा : प्रतिनिधी 

कुडाळ – मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या मडुरा येथील निवासस्थानी गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी देवस्थान समितीचे मानकरी दत्ताराम परब यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.

 

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, उपजिल्हाप्रमुख झेवियर फर्नांडिस, मडूरा सरपंच उदय चिंदरकर, उपसरपंच बाळू गावडे, इन्सुली सरपंच तात्या वेंगुर्लेकर, देवस्थान समिती पदाधिकारी सोमनाथ परब, मडूरा सोसायटी संचालक लाडू परब, ग्राम कमिटी अध्यक्ष दिलीप परब, नाना पेडणेकर उपस्थित होते.

 

यावेळी आमदार निलेश राणे यांनी अन्य पदाधिकाऱ्यांच्या घरी भेट देऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. मडूरा गावातील प्रलंबित विकास कामांबाबतही त्यांनी चर्चा केली.