गावोगाव विकासाचा मंत्र रुजवण्याचा निर्धार- आमदार शेखर निकम
देवरूख (प्रतिनिधी) :
संगमेश्वर तालुक्यातील वांझोळे बुद्रुक सनगलेवाडी येथील ग्रामस्थांनी आमदार शेखर निकम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) मध्ये जाहीर प्रवेश केला आहे.
यासाठी ग्रामस्थांनी सावर्डे येथील आमदार शेखर निकम संपर्क कार्यालयाला भेट देऊन त्यांच्याशी सविस्तर संवाद साधला. वाडीच्या विकासाशी निगडित प्रश्नांवर आमदारांनी संयमीपणे चर्चा केली. “गावाची प्रगती हेच माझे ध्येय, तुमचा विश्वास हीच माझी ताकद. प्रत्येक समस्या सोडवण्याचा प्रयत्न करीन, तुमच्यासोबत खंबीरपणे राहीन.” असे आश्वासन आमदार निकम यांनी ग्रामस्थांना दिले. शांत, संयमी स्वभाव, कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जाण्याची वृत्ती तसेच सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, सहकार, उद्योग व पर्यटन क्षेत्रातील सातत्यपूर्ण विकासकामे हीच आमदार निकम यांची खरी ओळख ठरली आहे. त्यांच्या विकासदृष्टीने प्रभावित होऊन ग्रामस्थांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
या प्रवेश सोहळ्यात दत्ताराम सनगले, महेंद्र सनगले, अनिल सनगले, जय हिंद सनगले, सिताराम सनगले, शांताराम सनगले, शशिकांत सनगले, सोमा सनगले, बुधाजी सनगले, राजश्री सनगले, भाग्यश्री सनगले, संतोष सनगले, हरिश्चंद्र सनगले, धनंजय जोयशी, अक्षय सनगले, अमित सनगले, प्रमिल सनगले, बाजीप्रभू सनगले, अनिकेत सनगले, रोहन सनगले, प्रेम सनगले आदी ग्रामस्थांनी जाहीर प्रवेश केला. यावेळी मंगेश बांडागळे, नितीन भोसले, बाळशेठ पंदरे, मानसी करंबेळे, निधी पंदरे, वांझोळे सरपंच रामूशेठ पंदरे, दीपक सनगले आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.













