खेडातून गणेश भक्तांसाठी मोफत रेल्वे प्रवासाची सुविधा

खेड (प्रतिनिधी) : गणेश भक्तांसाठी सुखकर परतीच्या प्रवासाची सोय म्हणून खास उपक्रम राबविण्यात आला आहे. सन्माननीय गृहराज्य मंत्री योगेश दादा कदम यांच्या वतीने गणेशोत्सवासाठी अजून एक दिवस मोफत रेल्वे प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
ही विशेष मेमू गाडी रविवार, दिनांक ७ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ८ वाजता खेड रेल्वे स्टेशनवरून सुटणार असून मोठ्या संख्येने गणेश भक्त, शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते याचा लाभ घेणार आहेत. या उपक्रमात खेड तालुक्यातील विविध भागातील कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
गणेश भक्तांच्या सोयीसाठी या प्रवासाचे नियोजन करण्यात आले असून, इच्छुकांनी आपली नावे खेड तालुका प्रमुख सचिन धाडवे, युवा सेना तालुका प्रमुख मिलिंद काते आणि शहर प्रमुख कुंदन सातपुते यांच्या कडे नोंदवावी असे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमाचे एकूण नियोजन सतिश उर्फ पप्पू चिकणे, खेड शहर प्रवक्ता यांनी केले आहे.