कळंबनी येथे वॅगनआरची तीन गाडयांना धडक

खेड तालुक्यातील कळंबनी येथे मुंबई गोवा महामार्गावर असणाऱ्या सीएनजी पंप समोर भरधाव व्हॅगनार कारने तीन गाड्यांना धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात दोघांना गंभीर दुखापत झाली असून हा अपघात दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडल्या. मुंबई गोवा महामार्गावर असणाऱ्या सीएनजी पंपा बाहेर नेहमीच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे महामार्गावर पाहावयास मिळते यापूर्वी देखील येथील स्थानिकांनी या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता वर्तवली होती.