सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे कार्य गौरवास्पद!!”  – पदमश्री प. पू.ब्रम्हेशानंद स्वामी

दोडामार्ग l सुहास देसाई :सिंधुदुर्ग जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी, व्यापाऱ्यांसाठी आणि इतर व्यवसायांसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिकपुरवठा करणारी सिंधुदुर्ग जिल्हा बँक उत्कृष्ट काम करत आहे. तिच्या या कार्याचा गौरव म्हणून बँकेला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. जिल्हा बँक अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले हे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे. यापुढेही बँकेने असेच चांगले कार्य करावे, असे आवाहन फोंडा, गोवा येथील श्री दत्त पद्यनाभ पीठ पिठाधिश्वर पद्यमश्री प. पू. ब्रह्म्हेशानंद स्वामीजी यांनी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांना केले.

दोडामार्ग येथील धाटवाडी येथेगुरुपीठचे शिष्य श्री दामोदर नाईक यांचे घरी श्री गणेशोत्सव उत्सव निमित्त श्री. स्वामी आले होते.त्यावेळी मनीष दळवी यांनी दर्शन घेतले त्यावेळी ते बोलत होते त्यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, कसई- दोडामार्ग नगरपंचायतीचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण, भाजपचे तालुकाध्यक्ष दीपक गवस, देवेंद्र शेटकर, पत्रकार सुहास देसाई यांच्यासह दोडामार्ग तालुका परिसरातील इतर भक्तगण उपस्थित होते.