पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी घेतले बांद्याच्या बाप्पाचे दर्शन

बांदा : प्रतिनिधी

राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकासमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी आज बांदा येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गांधी चौक येथील बांद्याच्या बाप्पाचे दर्शन घेतले. मंडळाचे अध्यक्ष अनय स्वार यांच्या हस्ते त्यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, बांदा सरपंच प्रियांका नाईक, उप सरपंच आबा धारगळकर, ग्रामपंचायत सदस्य रूपाली शिरसाट, माजी उपसरपंच बाळू सावंत, भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस जावेद खतीब, बांदा मंडल अध्यक्ष स्वागत नाटेकर, बांदा व्यापारी संघाचे अध्यक्ष दत्तप्रसाद पावसकर, निलेश कदम, शैलेश केसरकर, शहराध्यक्ष बाबा काणेकर, माजी सरपंच दीपक सावंत यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सदस्य उपस्थित होते.