मसुरे (प्रतिनिधी ): मसुरे देऊळवाडा येथील रहिवाशी श्रीमती सुलोचना(भीमा) बाळकृष्ण सावंत (80 वर्ष ) यांचे राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या मनमिळाऊ होत्या. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सुन, मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.देऊळवाडा येथील कार्यकर्ते मंगेश सावंत यांच्या आई होत.












