भाजपा युवा मोर्चा गुहागर तालुकाध्यक्षपदी प्रथमेश पाडेकर यांची निवड

गुहागर | प्रतिनिधी
भारतीय जनता पक्ष गुहागर तालुका युवा मोर्चा तालुकाध्यक्षपदी वडद गावचे सुपुत्र प्रथमेश पाडेकर यांची नियुक्ती तालुकाध्यक्ष अभय भाटकर यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली.

भारतीय जनता पक्षाचे गुहागर तालुकाध्यक्ष अभय भाटकर, माजी तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुका कार्यकारिणी पदाधिकारी बैठक नुकतीच पार पडली यावेळी प्रथमेश पाडेकर याला नियुक्तीचे पत्र देण्यात आले. प्रथमेश पाडेकर हे गेली 10 वर्षे भारतीय जनता पक्षाचे सक्रीयरित्या काम करत असून बुथ प्रमुख, युवा मोर्चा मध्ये उत्तम काम केले असून सध्या ते वडद ग्रामपंचायत सदस्य म्हणून कामकाज करत असून सामाजिक कामात अग्रेसर आहेत. कुणबी समाजाचे असलेले प्रथमेश पाडेकर यांची नियुक्ती युवा मोर्चा तालुकाध्यक्षपदी करून भारतीय जनता पक्षाने तालुका कार्यकारिणीमध्ये सर्व भागाचा विचार करत सर्व घटकांना सामावून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

युवा मोर्चा तालुकाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सर्वांना सोबत घेऊन सर्व भागात प्रवास करून केंद्र व राज्य शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या योजना पोहचविण्यासाठी प्रयत्न करून भाजपाचे युवा संघटन वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी भाजपा गुहागर तालुका सरचिटणीस सचिन ओक, संतोष सांगळे, मंगेश रांगळे, गजानन वेल्हाळ, गुहागर शहराध्यक्ष नरेश पवार, उपाध्यक्ष विनायक सुर्वे, आशिष विचारे, धनश्री मांजरेकर, श्रीकांत मोरे, संदिप कोंडविलकर, महिला आघाडी तालुकाध्यक्ष प्रांजली कचरेकर, चिटणीस राजेंद्र नरवणकर, प्रियांका जाधव उपस्थित होते