लांजा (प्रतिनिधी) लांजा तालुक्यातील भांबेड गावचे सुपुत्र आणि ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक, कलाकार अमोल रेडीज यांची राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन योजना रत्नागिरी जिल्हा निवड समितीच्या सदस्य पदी निवड झाली आहे .
लांजा तालुक्यातील भांबेड येथील रहिवासी असलेले अमोल लेडीज हे गेल्या अनेक वर्षांपासून नाट्य,अभिनय ,कला आधी विविध क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत आहेत. हिंदी-मराठी चित्रपट ,शॉर्ट फिल्म, टीव्ही सिरीयल, वेब सिरीज, मराठी एकांकिका, नाटके आधी विविधांगी क्षेत्रात भूमिका करून रंगभूमी, चित्रपट क्षेत्र गाजवणाऱ्या अमोल रेडीज यांची नुकतीच आमदार किरण सामंत आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या आदेशाने राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन योजना रत्नागिरी जिल्हा समितीच्या सदस्य पदी निवड करण्यात आली आहे.
अमोल रेडीज यांनी कलाकार,दिग्दर्शक अशा विविध भूमिका यशस्वीपणे साकारलेला आहेत.आणि त्यांच्या या एकूणच सांस्कृतिक योगदानाच्या सन्मान, त्यांचे कार्यची दखल म्हणून त्यांची ही निवड झाली आहे.साहित्य व कलावंतांच्या हितासाठी ते निश्चितच उपयुक्त ठरतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
कोकणच्या लाल मातीशी नाल जोडलेले अमोल रेडीज हे अमोल रंगतात्री या संस्थेचे सर्वेसर्वा त्याप्रमाणे ज्येष्ठ रंगकर्मी, उत्कृष्ट एकांकिका लेखक दिग्दर्शक अशा विविधांगी भूमिका त्यांनी साकारलेले आहेत. आणि म्हणूनच त्यांच्या या नव्याने झालेल्या निवडीबद्दल त्यांच्यावर तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.











