छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाहण्यास पर्यटकांची गर्दी
मालवण | प्रतिनिधी : मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य पुतळा पाहण्याससाठी पर्यटकांची गर्दी होत आहे.
गेले दोन महिने किल्ले परिसरात पदपथाची आवश्यक दुरुस्ती व इतर अनुषंगिक कामे असल्याने प्रशासनाच्या वतीने किल्ला बंद ठेवण्यात आला होता. गणेश चतुर्थी दरम्यान किल्ला खुला करण्यात आला आहे. मात्र किल्ले परिसरात आजूबाजूला किरकोळ दुरुस्तीची कामे सुरु राहतील. अशी माहिती सार्वजनिक बांधकाम उपविभाग मालवण सहाय्यक अभियंता अजित पाटील यांनी दिली आहे.
मालवणचा सागरी पर्यटन (जल पर्यटन) हंगाम 1 सप्टेंबर पासून सुरु होतो. आता या नव्या हंगामातही किल्ले सिंधुदुर्ग सोबत किल्ले राजकोट छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्यदिव्य पुतळा पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.











