BREAKING : रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्षपद नामाप्र महिलेसाठी आरक्षित

मुंबई : अवघ्या दोन महिन्यांवर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका येऊन ठेपलेल्या असतानाच आज राज्यातील विविध जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत आज काढण्यात आली आहे

यामध्ये 30 सप्टेंबर 2022 रोजी निश्चित केले आरक्षण रद्द करून ग्रामविकास विभाग राज्य शासन यांनी नव्याने आरक्षण सोडत घोषित केली आहे महाराष्ट्र जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती आणि पंचायत समिती सभापती उपसभापती पदांचे आरक्षण व निवडणूक नियम 1962 मधील नियम दोन व दोन क व दोन ड मधील तरतुदीनुसार अडीच वर्षांकरिता राज्यातील 32 जिल्हा परिषद अध्यक्ष पदांसाठी ही आरक्षण सोडत काढण्यात आली त्यामध्ये रत्नागिरीचे अध्यक्ष पद हे नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला या प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे रायगड आणि सिंधुदुर्ग साठी हे पद सर्वसाधारण गटातील उमेदवारासाठी खुले झाले आहे.