बांदा पाटेश्वर मंदिरात रविवारी ‘डबलबारी भजनाचा’ जंगी सामना

बांदा l प्रतिनिधी :बांदा पोलीस स्टेशन आवारातील श्रीदेव पाटेश्वर मंदिर येथे रविवार १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता गणेशोत्सवानिमित्त ‘डबलबारी भजनाचा’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सद्गुरू संगीत भजन मंडळ पिंगुळीचे बुवा वैभव सावंत आणि श्री दत्तगुरु प्रासादिक भजन मंडळ कासार्डे चे बुवा उत्कर्ष पारकर यांच्यामध्ये हा सामना रंगणार आहे.

 

बुवा वैभव सावंत यांना निखिल पावसकर (पखवाज) आणि साई नाईक (तबला) हे साथसंगत देणार आहेत. तर उत्कर्ष पारकर यांना संकेत पवार (पखवाज) आणि भावेश लाड (तबला) हे साथ देतील.

 

भजनप्रेमींनी कार्यक्रमासह श्री गणेश दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे व कर्मचाऱ्यांनी केले आहे.

———