राजापूर (वार्ताहर): येथील राजापूर तालुका कुणबी पतपेढीच्या सभासदांची ३१ वी वार्षिक अधिमंडळ बैठक रविवार दि. १४ सप्टेबर रोजी सकाळी १० वाजता राजापूर हायस्कुल कलामंदिर सभागृहात संस्थेचे अध्यक्ष प्रकाश मांडवकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे.
या सभेत मागील वार्षिक अधिमंडळ बैठकीचे इतिवृत्त वाचून कायम करणे, दि. ३१ मार्च २०२५ अखेरचा वार्षिक अहवाल, ताळेबंद, नफा तोटा पत्रक स्विकृत करणे, सन २०२४-२५ अखेर झालेल्या नफा विभागणीस मान्यता देणे व लाभांश जाहीर करणे, सन २०२५-२६ सालाकरिता वार्षिक अंदाजपत्रकास मंजुरी देणे व सन २०२४-२५ मधील अंदाजपत्रकातील खर्चाची माहिती देणे व मान्यता घेणे, दि. ३१ मार्च २०२५ अखेरच्या वैधानिक लेखापरिक्षण अहवाल यांची माहिती घेणे, संचालकांना व त्यांच्या नातेवाईकांना दिलेल्या कर्जाची माहिती घेणे, सुधारीत आदर्श उपविधी स्विकारण्याबाबत, संस्थेचे कार्यक्षेत्र वाढीबाबत चर्चा करून निर्णय घेणे, सन २०२५-२६ सालाकरिता वैधानिक लेखापरीक्षक यांची नेमणुक करणे व मानधनास मान्यता देणे, सन २०२५-२६ सालाकरिता बाहेरील कर्जमर्यादा निश्चित करणे या विषयांवर चर्चा होणार आहे.
तसेच सभासदांना अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत सेवा सुविधा देण्यासाठी अन्य बँकातील खात्याला मान्यता देणे, सभासदांकडून ताळेबंद पत्रक व नफा तोटा पत्रक यांस अनुसरून आलेल्या लेखी स्वरूपातील सूचना यांची वाचून नोंद घेणे व अध्यक्षांच्या परवानगीने येणाऱ्या आयत्या वेळच्या विषयांवर चर्चा करून निर्णय घेणे आदी विषयांवर चर्चा होणार आहे.
या बैठकीला सर्व सभासदांनी उपस्थीत रहावे असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी जितेद्र पाटकर यांनी केले आहे













