शशिकांत घाणेकर बुरंबाड चे तंटामुक्त समिती अध्यक्ष

माखजन वार्ताहर
संगमेश्वर तालुक्यातील बुरंबाड गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्षपदी गावातील प्रतिष्ठित नागरिक शशिकांत विश्राम घाणेकर यांची निवड करण्यात आली आहे.शशिकांत घाणेकर यांची ह्या समिती च्या अध्यक्षपदी सलग चौथ्यांदा निवड झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
समाजिक,शैक्षणिक,सांस्कृतील क्षेत्रात लिलया वावर वावर असणाऱ्या शशिकांत घाणेकर यांना सर्वच क्षेत्रातील चांगला अनुभव आहे.सर्व स्तरातील लोकांना एकत्र घेऊन काम करणाऱ्या शशिकांत घाणेकर यांची नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या,ग्रामसभेत तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष पदाची माळ गळ्यात घालण्यात आली.
गेली ३ वर्षे गावात शांतता व एकोपा राखण्यात त्यांना यश आल्याने,व खऱ्या अर्थाने गाव तंटामुक्त ठेवण्यात सफल झाल्याने त्याची बिनविरोध निवड झाली.त्यांच्या फेरनिवडी बद्दल पंचक्रोशीतून अभिनंदन करण्यात येत आहे.