पोलिस निरीक्षक अरुण पवार यांचे भाजपकडून स्वागत

दोडामार्ग l सुहास देसाई :दोडामार्ग पोलिस निरीक्षकपदी श्री अरुण पवार यांची नियुक्ती झाल्याबद्दल भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी व तालुका अध्यक्ष सुधीर दळवी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले

यावेळी त्यांच्या समवेत चंदकांत मळीक,बळीराम नाईक, सरपंच अजित देसाई,प्रथमेश मणेरीकर ,शिरीष नाईक, आदी उपस्थित होते.

यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. पवार साहेब यांनी मार्गदर्शन करताना सांगितले कि , तालुक्यांतील काही गावांमध्ये फिरून आलो, येथील वातावरण चांगले आहे.लोक ही चांगले आहे.मी माझ्या परीने पुर्णपणे चांगले काम करण्याचा प्रयत्न नक्की करेन.मात्र सर्वाचे सहकार्य आवश्यक आहे.

नाडकर्णी यांनी सांगितले की आमचे सहकार्य मिळेल,आज , गांजा मोठ्या प्रमाणात तालुक्यात येत असल्याने तरुण पिढी वाया जात आहे.ही समाजाला लागलेली किड आहे.ही नष्ट करणे गरजेचे आहे. दोडामार्गची पोलिस चौकी बंद करण्यात आल्याने अवैध धंदे वाढले आहे.ते त्वरित बंद करा,

पोलिस ठाण्याची इमारत स्वातंत्र नसल्याने अनेक अडचणी येत आहेत.यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करण्यात येणार आहे.

असे नाडकर्णी यांनी सांगितले.