अभियानात तालुका, जिल्हा,तसेच विभाग स्तरावर अव्वल स्थानी राहण्यासाठीचा ग्रामस्थांचा निर्धार.
कुडाळ:- आंदुर्ले ग्रामपंचायतीची मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानची विशेष ग्रामसभा ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागाने संपन्न झाली. या सभेसाठी सरपंच अक्षय तेंडोलकर,उपसरपंच चंद्रकीसन मोर्ये,सर्व ग्रामपंचायत सदस्य,माजी सभापती संजयजी वेंगुर्लेकर,माजी सरपंच आरती पाटील,कृषी अधिकारी महादेव खरात ,मा. सरपंच ,सर्व आशा सेविका, सर्व अंगणवाडी सेविका, अधिकारी तलाठी, पोलीस पाटील ,आरोग्य सेवक ,कृषी अधिकारी सर्व शाळांचे मुख्याध्यापक ,सीआरपी,ग्राम संघाचे अध्यक्ष ,बचत गटाच्या महिला अशा एकूण २०० पेक्षा जास्त मतदार ग्रामस्थ या ग्रामसभेला उपस्थित होते. ग्रामसेवक श्री.कृष्णा पेडणेकर यांनी स्वागत केले. दिपप्रज्वलन करून व श्रीगणेश व महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजीमहाराज्यांना वंदन करुन अभियान बाबत सविस्तर माहिती उपस्थित ग्रामस्थांना यावेळी देण्यात आली. ग्रामस्थांनी तालुकाच नव्हे तर जिल्हा व विभाग स्तरावर अव्वल स्थान प्राप्त करण्यासाठी हे अभियान यशस्वीपणे राबविण्याचा निश्चय केला. त्यानंतर अभियानाच्या अनुषंगाने समित्या स्थापन करण्यात आल्या. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मा.देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे अभियानासंमंधीचे मार्गदर्शन व्हिसी द्वारे पाहीले. सरपंच अक्षय तेंडोलकर यांनी अभियाना संमंधी मार्गदर्शन व उपस्थितांचे आभार मानले.











