लांजा तालुका भाजपाच्या वतीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

वाढदिवसाच्या निमित्ताने घेण्यात आले विविध कार्यक्रम

लांजा (प्रतिनिधी) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस लांजा तालुक्यात उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने लांजा तालुका भाजपाच्या वतीने तालुक्यात विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आले.
बुधवारी १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस लांजा तालुका भाजपाच्या वतीने लांजा शहर आणि तालुक्यात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यामध्ये लांजा शहरातील कुलकर्णी काळे छात्रालयातील मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. यानंतर लांजा कोंड्ये येथील भाकर संस्थेच्या वृध्दाश्रमाला भेट देऊन
तेथील वृद्ध व्यक्तींची भेट घेऊन संवाद साधला. त्यांची आस्थेने विचारपूस केली आणि त्यांना फळ वाटप करण्यात आले.
अशाप्रकारे विविध सामाजिक, शैक्षणिक संस्थांमध्ये जाऊन लांजा तालुका भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी खऱ्या अर्थाने आपली सामाजिक बांधिलकी जपत येथील मुलांशी, वृद्ध यांच्याशी आपुलकीने संवाद साधला याबद्दल त्या- त्या संस्थेच्या पदाधिकारी शिक्षक वर्ग यांनी भाजपा पदाधिकाऱ्यांचे विशेष आभार मानले.

 

. अशाप्रकारे भाजपा पदाधिकाऱ्यांनी आपल्या लाडक्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस
केवळ बॅनरबाजी करून साजरा न करता समाजातील दिनदलितांसाठी काम करणाऱ्या संस्थेत जाऊन त्यांच्याशी हितगुज, संवाद साधत त्यांना फळ वाटप आणि शैक्षणिक साहित्य वाटप करून केला.
दरम्यान , या सर्व कार्यक्रमांना भाजपा दक्षिण मंडळ तालुकाध्यक्ष शैलेश खामकर, विशेष निमंत्रित सदस्य विजय कुरूप, जिल्हा उपाध्यक्ष संजय यादव,
जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत मांडवकर, जिल्हा चिटणीस हेमंत शेट्ये , जिल्हा कार्यकारणी सदस्य श्रीकृष्ण उर्फ बब्या हेगीस्टे, चंद्रकांत दादा खामकर, प्रमोद कुरूप, महेंद्र शेडे, शेखर सावंत, रवींद्र राणे, अशोक गुरव, अनिल कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.