खेड – (प्रतिनिधी)
क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मान्यतेने तसेच जिल्हा क्रीडा परिषद रत्नागिरी आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी यांच्या विद्यमाने आंबडस हायस्कूल येथे तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल खेडच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत क्रीडा क्षेत्रातील आपली चुणूक दाखवली.
या स्पर्धेत 19 वर्षाखालील मुलींच्या गटात रोटरी स्कूलच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला, तर 17 वर्षाखालील मुलांच्या गटात द्वितीय क्रमांक मिळवत दुहेरी यश संपादन केले.
17 वर्षाखालील मुलांच्या विजयी संघात कु. आर्यन घोरपडे, कु. साईराज पाष्टे, कु. प्रणव भोसले, कु. प्रयाग भोसले, कु. जय खाडे, कु. विराज भरनकार, कु. चिन्मय ठाकरे, कु. मुहंमद हुसेनी, कु. जिशान शेख, कु. उत्कर्ष राठोड, कु. उजैर दळवी व कु. श्रवण खापरे यांनी उल्लेखनीय खेळ दाखवला. तर 19 वर्षाखालील मुलींच्या गटात अंतरा सावंत, कु. मुग्धा शिंदे, कु. भूमी पाटील, कु. वांशिक पाटणे, कु. सई कोतकुंडे, कु. विधी गोरे, कु. तनिष्का खेडेकर, कु. तनया खानविलकर, कु. अर्ना साडविलकर, कु. अनुष्का म्हतले आणि कु. संस्कृती पाटील यांनी विजेतेपद पटकावले.
या यशामुळे रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांवर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. विशेष म्हणजे, प्रथम क्रमांक मिळवलेल्या मुलींच्या संघाची निवड आता फाटक हायस्कूल, रत्नागिरी येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे.
या विद्यार्थ्यांना क्रीडाशिक्षक श्री. विजय केळसकर आणि सौ. शितल घाणेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे चेअरमन मा. बिपीनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.













