मंडणगड/ प्रतिनिधी : येथील मंडणगड तालुका विकास मंडळ संचलित लाल बहादूर शास्त्री हायस्कूल दहागाव मध्ये विद्यार्थी शिक्षक दिन आज शनिवार दिनांक 20 सप्टेंबर 2025 रोजी उत्साहात साजरा करण्यात आला.
यामध्ये शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी म्हणून सुमारे 17 विद्यार्थी सहभागी झाले त्यात कुमारी आर्या चव्हाण हिने मुख्याध्यापक पद स्वीकारले होते. विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या भूमिकेत जाऊन अध्यापनाचा अनुभव यावा शिक्षकांच्या अडीअडचणी समस्या ची जाणीव व्हावी आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभागाच्या वतीने करण्यात आले होते.
पहिले काही तास अध्यापनाचे घेतल्यानंतर विद्यार्थ्यांची सभा घेण्यात आली. सर्वप्रथम शिक्षक बनलेल्या विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांना व शिक्षकेतर कर्मचारी यांना कृतज्ञतापूर्वक गुलाब पुष्प दिले. यानंतर विद्यार्थ्यांमधून बनलेल्या शिक्षकांनी आपली विविध प्रकारे मनोगते व्यक्त केली. प्रशालेतील शिक्षक किशोर कासारे यांच्या,’ उत्थान ‘ या पुस्तकाचे माननीय मुख्याध्यापक श्री. विजय खाडे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. करण्यात आले. कुमारी तनिष्का जाधव व कुमारी स्मरणिका गायकवाड यांनी मुख्याध्यापक श्री. विजय खाडे यांची प्रकट मुलाखत घेतली. ही मुलाखत छान रंगली .सरांनी सांगितलेल्या अनुभवांमध्ये विद्यार्थी रंगून गेले. हे मुलाखत निश्चितच प्रेरणादायी होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी तन्वी तांबुटकर व कुमारी स्मर्णिका गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थ्यांनी खूप मेहनत घेतली.
या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.












