फोंडाघाट | कुमार नाडकर्णी –– क्रीडा व युवक सेवा संचलनाय, महाराष्ट्र राज्य पुणे,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद,सिंधुदुर्ग यांचे मार्फत कळसुली हायस्कुल, कळसुली येथे तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.या स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, फोंडाघाटच्या विद्यार्थ्यांनी आपले वर्चस्व प्रस्थापित करीत घवघवीत यश संपादन केले.I)14 वर्ष वयोगट मुले(प्रथम क्रमांक) २)17 वर्ष वयोगट मुले(प्रथम क्रमांक) ३)17वर्ष वयोगट मुली(द्वितीय क्रमांक)४)19 वर्ष वयोगट मुले(प्रथम क्रमांक)
प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.यशस्वी संघांतील खेळाडू आणि मार्गदर्शक शिक्षक श्री .ए.व्ही.पोफळे यांचे फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी फोंडाघाटचे चेअरमन, सेक्रेटरी, खजिनदार शाळा समिती चेअरमन,संचालक, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.प्रसाद कृष्णा पारकर,पर्यवेक्षक श्री.व्हि.पां.राठोड,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी हार्दिक अभिनंदन केले आणि जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्यायशस्वी संघांतील खेळाडू आणि मार्गदर्शक शिक्षक श्री .ए.व्ही.पोफळे यांचे फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी फोंडाघाटचे चेअरमन, सेक्रेटरी, खजिनदार शाळा समिती चेअरमन,संचालक, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.प्रसाद कृष्णा पारकर,पर्यवेक्षक श्री.व्हि.पां.राठोड,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी हार्दिक अभिनंदन केले आणि जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या…










