खेड (प्रतिनिधी) – खोपी प्रभागातील तिसंगी केंद्राची शिक्षण परिषद बिजघर कोंड शाळेत मोठ्या उत्साहात व आनंददायी वातावरणात पार पडली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजय सकपाळ होते. शिक्षण प्रेमी तुकाराम पार्टे यांनी श्रीफळ वाढवून शिक्षण परिषदेचे उद्घाटन केले.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला बिजघर कोंड वाडी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सरला मावळी यांनी सर्व मान्यवर व उपस्थितांचे मनःपूर्वक स्वागत केले. शिक्षण परिषदेचे सूत्रसंचालन सौ. जया दोरकर यांनी कुशलतेने केले.
यावेळी तिसंगी हायस्कूलचे शिक्षक शैलेश सकपाळ, बीजघर नंबर एक शाळेचे विजय सकपाळ तसेच तिसंगी केंद्राचे केंद्रप्रमुख महेंद्र जाधव यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण परिषदेचे महत्त्व अधोरेखित झाले.
ही शिक्षण परिषद यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका सरला मावळी, शिक्षिका जया दोरकर, विजय सकपाळ, संदीप घाणेकर, शैलेश पराडकर, नारायण शिरकर, रोहन देवकते, सुनिल जंगम, अंकिता भोसले, तृप्ती काताळे, अनुराधा शिंदे, ज्योती सांगळे यांच्यासह बिजघर कोंड गावातील ग्रामस्थ बंधू-भगिनींनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत मेहनत घेतली.
या परिषदेमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दलची जागरूकता अधिक दृढ होऊन शैक्षणिक उन्नतीला चालना मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.













