देवगड : प्रतिनिधी
टेंबवली कालवी खाडीमधील कांदळवन वृक्ष तोडल्याप्रकरणी तेथिल शामसुंदर गणपत कोयंडे(६५) यांच्याविरूध्द देवगड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.याबाबतची तक्रार कणकवली उपविभागीय अधिकारी तथा तालुकास्तरीय कांदळवन संरक्षण संवर्धन समिती अध्यक्ष जगदीश कातकर यांनी दिली.
टेंबवली कालवी येथील शामसुंदर गणपत कोयंडे यांनी दि. १६ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ९.३० ते १० वा.सुमारास कांदळवन वृक्ष तोडण्यास बंदी आहे हे माहित असताना कालवी खाडीतील कांदळवन वृक्षाची तोड केली.याबाबत देवगड पोलिस स्थानकात उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ १५(१) अन्वये शामसुंदर कोयंडे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला असून तपास महिला पोलिस हवालदार प्राजक्ता कविटकर करीत आहेत.










