धान खरेदी, भात खरेदी व विक्रीत संघाचे काम उत्कृष्ट
पणन महासंघाकडून चेअरमन प्रमोद रावराणे यांचा सत्कार
वैभववाडी l प्रतिनिधी: वैभववाडी तालुका खरेदी विक्री संघाने शेतकऱ्यांसाठी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची दखल घेत महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाने संघाला राज्यस्तरीय सन्मानाने गौरविले आहे. राज्यात धान खरेदी, भात खरेदी विक्री विक्रीमध्ये संघाने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. पणन महासंघाच्या वतीने संघाचे चेअरमन प्रमोद रावराणे, संचालक श्री इंदुलकर व इतर संचालक यांना सन्मानित करण्यात आले आहे. मुंबई येथे हा सन्मान सोहळा पार पडला. संघाच्या समाधानकारक कामगिरीबद्दल वैभववाडी तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा मुंबई येथे पार पडली. यावेळी पणन महासंघाचे चेअरमन दत्तात्रय पानसरे, व्हा. चेअरमन उपाध्यक्ष रोहीत निकम, संचालक तथा वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे,
मा.आम. जयंत पाटील, संचालक प्रमोद रावराणे, संदीप नरके कोल्हापूर, आबासो पाटील,हिंगणकर, हिवसे, घुगे, रघाताटे, सुनिल चव्हाण, हटकर, गण्यार पवार, घाडगे मॅडम, धस मॅडम, व्यवस्थापकीय संचालक श्रीधर डुबे व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वैभववाडी खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष शेतकऱ्यांच्या हितासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. संघाच्या चांगल्या कामगिरीची दखल पणनने घेतली आहे. संघाच्या सन्मानानंतर चेअरमन प्रमोद रावराणे व सर्व संचालकांचे अभिनंदन करण्यात येत आहे.












