रोटरी क्लब मालवणच्या वतीने सिंधुदुर्ग महाविद्यालय येथे आयोजन
मालवण | प्रतिनिधी: रोटरी क्लबच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त मालवण रोटरी क्लबच्या वतीने आणि स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटनेच्या सहकार्याने आयोजित सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. २५ रक्तदाते यांनी रक्तदान केले.
जागतिक पातळीवर कार्यरत असणारा रोटरी क्लब यावर्षी २५ व्या वर्षात पदार्पण करत आहे. यानिमित्त १ जुलै २०२३ ते ३० जून २०२४ असे रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे होणार आहे. यानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात येणार असून या अंतर्गत रोटरी क्लबतर्फे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उदघाटन स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी रोटरी क्लबचे नूतन अध्यक्ष अभय कदम, सचिव संदेश पवार, माजी अध्यक्ष रतन पांगे, महादेव पाटकर, उमेश सांगोडकर, सुहास ओरसकर, रमाकांत वाक्कर, रंजन तांबे, अवी नेरकर, यश तारी, सिंधुदुर्ग महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सुधीर धुरी, सचिव अमेय देसाई, प्रदीप नाईकसाटम, ग्लोबल रक्तदाते समूहाचे नेहा कोळंबकर, राधा केरकर, संदीप पेडणेकर, समृद्धी धुरी, विकास पांचाळ तसेच निलेश गवंडी, हेमंत शिरगावकर, ललित चव्हाण, महाविद्यालयाचे प्राध्यापक, कर्मचारी आदी उपस्थित होते.
शिबिरातील रक्तदात्याना रोटरी क्लबकडून सन्मानचिन्ह व जिल्हा रक्तपेढी कडून प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या शिबिरासाठी जिल्हा रक्तपेढीचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
फोटो – मालवण रोटरी क्लबच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात रक्तदाते व रोटरी पदाधिकारी. (अमित खोत, मालवण)











