राजापूर, लांजा तालुका नागरिक संघ मुंबईच्या वतीने आयोजन
लांजा (प्रतिनिधी) राजापूर लांजा तालुका नागरिक संघ मुंबईच्या वतीने संघ सभासद व हीतचिंकांचे स्नेहसंमेलन रविवार दिनांक ९ जुलै रोजी कल्पना कॉलेज लांजा येथे आयोजित करण्यात आले आहे.
राजापूर व लांजा तालुक्यातील खेड्यांचा विकास साधण्याच्या हेतूने मुंबईतील चाकरमान्यांनी सन १९५३ मध्ये स्थापन केलेला संघ लवकरच ७५ व्या वर्षांत मार्गक्रमण करीत आहे. संघ सुरुवातीपासून तेथील समस्यांचा वाचा फोडण्याचा आणि विकासाची कामे करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यातून अनेक कामे मार्गी लागली आहेत. बदलत्या काळाप्रमाणे सामाजिक संस्थांना त्यांच्या कार्यात बदल करणे आवश्यक होते. त्याप्रमाणे संघाने प्रत्यक्ष गावाकडे सभासद नोंदणी करून त्यांच्या अनुभवाचा व ज्ञानाचा फायदा संघ कार्यात मिळवण्याचा प्रयत्न केला आहे.
संघ कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र येणारे कार्यक्रम संपल्यानंतर निघून जात असतात. आणि म्हणूनच प्रत्यक्ष भेट घेऊन एकमेकांचा परिचय करून घ्यावा तसेच आपापल्या कौतुकास्पद कार्य करणार्यांचे कौतुक करणे सेवानिवृत्तना शुभेच्छा द्याव्यात आणि एकत्र भोजन करणे या हेतूने या स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
तरी या कार्यक्रमाला सर्व संघ सभासद, हितचिंतकांनी उपस्थित राहावे असे आवाहन सरचिटणीस प्रमोद पवार, सहचिटणीस गणेश चव्हाण, प्रमोद मेस्त्री यांनी केले आहे.