जानवलीतील प्राणघातक हल्लाप्रकरणी आरोपींना न्यायालयीन कोठडी..!

कणकवली I मयुर ठाकूर : जानवली – आदर्शनगर येथील शिवानंद दत्तात्रय जंगम यांच्यावरील प्राणघातक हल्लाप्रकरणातील आरोपी प्रेमकुमार नलवडे याच्यावर अन्य तीन आरोपींना येथील न्यायालयाने न्यायालयीन कोठडी मंजूर केली. या चारही आरोपींची सावंतवाडी येथील जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली. आरोपींची पोलिस कोठडीची मुदत संपल्याने सर्व आरोपींना पोलिसांनी शुक्रवारी येथील न्यायालयासमोर हजर केले होते. शुक्रवारी २ डिसेंबर रोजी रात्री ९ वा. च्या सुमारास जानवली- आदर्शनगर येथे मारहाणीची घटना घडली होती.

Accused in Janwali assault case remanded to judicial custody..!

चार आरोपींनी लाकडी काठीने मारहाण करून शिवानंद जंगम याचे डोके फोडले होते. मारहाणीनंतर मारहाण करणारे चारही पसार झाले होते. मारहाणीत जबर जखमी झालेला शिवानंद जंगम यांच्यावर खाजगी रूग्णालयात अजुनही उपचार सुरू आहेत. घटनेनंतर तातडीने कणकवली पोलिसांनी आरोपीचा माग काढून चारही आरोपी कराड येथून ताब्यात घेतले होते. अटक झाल्यानंतर न्यायालयाने आरोपींना चार दिवसाची पोलिस कोठडी.