मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांची महत्वाची भूमिका
निवडणूक झाली बिनविरोध; संदीप सुर्वे झाले सभापती
रत्नागिरी । प्रतिनिधी : रत्नागिरीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी भाजपचे संदीप सुर्वे यांची बिनविरोध निवड झाली आहेत. यामध्ये मत्स्य व्यवसाय मंत्री तथा रत्नागिरीचे संपर्क मंत्री नितेश राणे यांनी महत्वाची भूमिका बजावली.
रत्नागिरी जिल्हा कृषि उत्पन्न बाजार समितीचा कार्यकाळ
दि. २७/०६/२०२३ते दि. २६/०६/२०२८असा आहे. यामध्ये यावर्षी संदीप सुर्वे यांच्याकडे सभापतीपद आले आहे. ही निवडणूक बिनविरोध झाली. यामध्ये प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा पाठपुरावा होताच तसेच राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री तथा रत्नागिरीचे संपर्क मंत्री नितेश राणे यांनी महत्वाची भूमिका बजावली. संदीप सुर्वे याना त्यांचे भक्कम पाठबळ होते.
कृषी उत्पन्न बाजार समिती हे महत्वाचे केंद्र असून येथे भाजपच्या सदस्य सभापती झाल्याने भाजपमध्ये उत्साह पसरला आहे.
बाजार समितीच्या संचालकांमध्ये सभापती संदिप हनुमंत सुर्वे यांच्यासह सुरेश भिकाजी सावंत, स्नेहल सचिन बाईत, गजानन कमलाकर पाटील, श्री. अरविंद गोविंद आंब्रे, श्री मधुकर दिनकर दळवी,श्री. सुरेश मारुती कांबळे, श्री. हेमचंद्र यशवंत माने, श्रीम. स्मिता अनिल दळवी, श्री. विजय वासुदेव टाकले, श्री नैनेश एकनाथ नारकर, श्री. रोहित दिलीप मयेकर, श्री. ओंकार संजय कोलते, श्री. प्रशांत यशवंत शिंदे, श्री. पांडूरंग जयराम कदम यांच्यासह जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था हे पदसिद्ध सदस्य आहेत.
या निवडीवेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.












