राजापूर तालुका चिरेखाण संघटनेच्या अध्यक्षपदी तरूण चिरेव्यावसायिक गुरुप्रसाद शिंदे यांची निवड

राजापूर | प्रतिनिधी : राजापूर तालुका चिरेखाण संघटनेच्या अध्यक्षपदी तरूण चिरेव्यावसायिक गुरुप्रसाद शिंदे यांची निवड झाली आहे. तर उपाध्यक्षपदी समिर आडिवरेकर यांची निवड झाली आहे.

नुकत्याच झालेल्या राजापूर तालुका चिरेखाण संघटनेच्या बैठकीत संघटनेची नुतन कार्याकारणी निवडण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी गुरूप्रसाद शिंदे, उपाध्यक्षपदी समिर आडीवरेकर, खजिनदारपदी बापू सप्रे, सचिवपदी आबा डोंगळे, प्रवीण लोकरे तर सदस्य म्हणून पंकज मोहरकर, ओंकार पेडणेकर आदींची निवड झाली आहे. या नवनिर्वाचित कार्यकारिणी पदाधिकारी व सदस्यांचे अभिनंदन होत आहे.