सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. नितेश राणे साहेब यांनी मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये सढळ हस्ते मदत करण्याचे आवाहन आत्ताच केले. त्याला तत्काळ प्रतिसाद देत भाजपा जिल्हा सरचिटणीस श्री. संदीप साटम यांनी मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये 11000/-(अकरा हजार रुपये) अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या पीडित शेतकरी व कुटुंबांना मदतीसाठी पाठवले. पीडित शेतकरी आणि कुटुंब हे लवकरात लवकर या नैसर्गिक आपत्तीतून सावरावे यासाठी प्रार्थना ही केली. पालकमंत्री श्री. नितेश राणे यांच्या आव्हाहना प्रमाणे प्रत्येक व्यक्तीने सढळ हस्ते मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये मदत करावी असे आवाहनही केले.
Home ताज्या घडामोडी पालकमंत्री श्री.नितेश राणे यांच्या आवाहनानंतर भा. ज. पा. जिल्हा सरचिटणीस श्री.संदीप साटम...













